श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
येथील नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये बाल दिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे या ही वर्षी विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. इयत्ता पहिली ते सातवीच्या १०९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. पालकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम शेख, उपाध्यक्ष अजीम शेख, सदस्य मोहसीन शेख, गुलाम रसूल बाबा,हुमा अलजीलानी, शाकिर सय्यद, मुक्तारभाई मनियार, शाळा नंबर ९ चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गफूर शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले शाळेचे विद्यार्थी हसनैनरजा जोहरअली शेख, अलीना अमजद पठाण,अश्मिरा फहीम पठाण,मुबशशिरा शेरू शेख,शिफाबानो इस्माईल शहा यांचा शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तसेच वर्गशिक्षिका शाहीन यासीन शेख यांचा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांचे शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्रशासन अधिकारी श्री पटारे यांनी उर्दू शाळेच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. शाळा क्रमांक पाच मध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शिक्षण मंडळाची एक उपक्रमशील व नावाजलेली शाळा म्हणून ही शाळा शहरात ओळखली जाते. या शाळेचा सर्व स्टाफ हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सातत्याने धडपड करीत असतो असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमात शिक्षक बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल बाळासाहेब सरोदे यांचा प्रशासन अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा सादर केली. त्याला पालकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून फारुक शाह, वहिदा सय्यद व निलोफर शेख यांनी काम पाहिले. त्यांना नसरीन ईनामदार, यास्मिन पठाण, उजमा पिरजादे यांनी सहाय्य केले. सदरची वेशभूषा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सर्वश्री. फारुक शाह, वहिदा सय्यद, नसरीन इनामदार शाहीन शेख अस्मा पटेल निलोफर शेख, बशिरा पठाण,मिनाज शेख, आसिफ मुर्तुजा,एजाज चौधरी, यास्मिन पठाण, जुनेद काकर, उजमा पीरजादे, रिजवाना कुरेशी, रेश्मा सय्यद, रिजवाना बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले. वेशभूषा स्पर्धेसाठी शाळेचा पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.सूत्रसंचालन आसिफ मुर्तजा यांनी केले तर शेवटी शाहीन शेख यांनी आभार मानले.