चंद्रकांत सी. पुजारी इंदूर ( म.प्र.)
इंदूर पंचक सिलत असोसिएशन तर्फे दि.१८,१९,२० नोव्हेंबर २०२२ रोजी गंगा कॉम्प्लेक्स लिंबोडी इंदूर याठिकाणी इंदूर जिल्हा पंचक सिलाट असोसिएशनतर्फे आयोजित ८ व्या राज्यस्तरीय पंचक सिलट स्पर्धेच्या ज्युनियर, सब-ज्युनियर, प्री-ज्युनियर स्पर्धेचा समारोप मोठ्या शानदार आणि रंगतदार पद्धतीने झाला,
यावेळी इंदूर जिल्हा पंचक सिलत असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.विक्रम देवरा यांनी सांगितले की, या स्पर्धेत राज्यातील १७ जिल्ह्यातील १९५ खेळाडू आणि अधिकारी सहभागी झाले होते.या स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्णपदक मिळविलेल्या खेळाडूंची १३ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत नांदेड (महाराष्ट्र) येथे होणाऱ्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले,
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.या स्पर्धेत मुलांच्या गटात संकल्प कुशवाह सिहोरे आणि मुलींच्या गटात हिमांशी जाट इंदोरे हिने सर्वोत्कृष्ट सेनानी पुरस्कार पटकावला. देवास जिल्ह्यातील निदिश दुबे आणि दिशा रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट पंचाचा पुरस्कार देण्यात आला. एकूण चॅम्पियनशिपचे विजेतेपद देवासने ३८ सुवर्णपदकांसह, भोपाळने २० सुवर्णपदकांसह, इंदूरने ८ सुवर्णपदकांसह जिंकले. या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी अबरार अहमद शेख (अध्यक्ष पंचक सिलाट असोसिएशन एम.पी.), पदमसिंग मस्करा, (तेजाजी नगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक) ,अभिरुची कनोजिया,अभय श्रीवास (सचिव पंचक सिलत असोसिएशन एम.पी.) आणि दुर्गेश यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेवटी विक्रम देवरा यांनी पाहुण्यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निकिता देवरा यांनी केले तर संतोष अहिरवार यांनी आभार व्यक्त केले.