महाराष्ट्र शासनाने गायरान व गावठाण जागा संदर्भात राज्यभरात गोरगरिबांचे अतिक्रमण काढण्यासाठी आदेश त्वरित थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टात फेर याचिका दाखल करून गरिबांना न्याय द्यावा अशी भूमिका पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप (भाऊ) वाघ यांची असून त्वरित शासनाने योग्य निर्णय घ्यावा असे त्यांनी शासनस कळवले आहे.
जावीद शेख पाचोरा:
मागील काही महिन्यात मा. न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य शासनाने गायरान व गावठाण असलेल्या जमीनवर रहिवासी असो किंवा दुकानदार असो या सर्वांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे या जमीनीवर वास्तव्यास असणाऱ्या राज्यभरातील गोरगरिबांमध्ये घबराट निर्माण झाली आहे,यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित दादा पवार यांनी ताबडतोब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देत सदरील गायरान व गावठाण जागेवर गोरगरिबांचे घरी असून ते पन्नास ते शंभर वर्षांपासून त्या ठिकाणी त्यांचा रहिवास असून महाराष्ट्र शासनाने पुन्हा सुप्रीम कोर्टात फेरी याचिका दाखल करावी, राज्य शासनाने गोरगरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे आपल्या निवेदनपत्रात नमूदही केले होते,
मात्र यानंतरही महाराष्ट्र शासनाने त्यांची कोणतीही दखल न घेता शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन प्रत्येक तालुक्यात गायरान, गावठाण जागा पंधरा दिवसाच्या आत खाली कराव्या अशा नोटिसा पाठविण्यात आल्या, त्यामुळे पाचोरा तालुक्यातील व शहरातील सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले, आपला परिवार रस्त्यावर येईल या भीतीने त्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली, त्यामुळे त्यांनी पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप (भाऊ) वाघ यांना भेटून आपल्या सर्व समस्या मांडल्या त्या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी व सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलीप भाऊ वाघ स्वतः आपल्या पक्षातर्फे मा. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन देणार असून सर्व गरिबांच्या भावना लक्षात घेऊन शासन दरबारी व्यथा मांडणार आहे, मा.न्यायालयाचे जरी आदेश असले तरी शासनाने त्यात योग्य भुमिका बजावत गोरगरीबांवर अन्याय होणार नाही अशी महत्वाची भुमिका बजवावी असेही ते म्हणाले आहे,
यावेळी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन भाऊ तावडे,पाचोरा नगरपालिका गटनेते संजय नाना वाघ,पाचोरा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विकास पाटील,राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष व मार्केट कमिटी माजी प्रशासक सदस्य रणजीत पाटील, खलील दादा देशमुख आदि उपस्थित होते.