शेवगांव (प्रतिनिधी) : माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त शेवगांव शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व ताहेर पटेल मित्र मंडळाच्यावतीने शेवगांव शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष ताहेर पटेल यांच्या स्वखर्चाने प्रभागातील सर्व प्रमुख चौकात व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे बसविण्यात आले, तसेच प्रभागातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रभागातील अनेक ठिकाणी अस्वच्छता असलेले परिसरात स्वखर्चाने जीसीबीच्या साह्याने परिसरात स्वच्छता करण्यात आली, स्वच्छता केल्यामुळे परिसरात रोगराई पासून नागरिकांचे संरक्षण होईल असे आगळे - वेगळे उपक्रम राबवून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच जाती-पातीच्या पलीकडे जाऊन प्रभागातील श्री हनुमान मंदिराला लोखंडी गेट बसविण्यात आले, यावेळी चाँद पठाण, प्रविण गायकवाड,शौकत शेख,निजाम पटेल,असिफ बेग, सुनिल गांगे, इश्वर गाढवाला , पेरु गंगे, अशपाक पठाण, इम्रान मनियार,अब्दुल बारी, शहनाज कुरेशी, संतोष गाणंगे, रवी जगधने, सचिन गवते, सुरेश गाढवाल, जावेद पठाण,सिराज मनियार, गफ्फार मनियार, साबिर शेख आदी उपस्थित होते.