अशोकनगर प्रतिनिधी :
आंतरवली सराटा येथील मराठा आरक्षणाच्या सभेसाठी निपाणीवाडगांव येथून रवाना होणाऱ्या मराठा मावळ्यांना युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे व सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी घोषणांच्या निनादात शुभेच्छा देत निरोप दिला.
श्रीरामपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज प्रतिनिधी मनोज जरांगे पा. यांचे सभेसाठी रवाना होत आहे. आज शनिवारी निपाणीवाडगांव येथे कारेगांव, मातापूर, खोकर व निपाणीवाडगाव येथील मराठा प्रतिनिधी एकञितपणे आंतरवली सराटा येथील सभेसाठी रवाना झाले. यावेळी "एक मराठा, लाख मराठा", "कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही", "मराठा एकजुटीचा विजय असो" अशा घोषणांच्या जल्लोषात सदरचे प्रतिनिधी रवाना झाले. यावेळी सिध्दार्थ मुरकुटे व सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी सदर प्रतिनिधींना शुभेच्छा देत निरोप दिला.
सहयोगी:
पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111