श्रीरामपूर प्रतिनिधी :
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर वांगी येथील प्राईड अकॅडमी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ॲनिमेशन क्षेत्रात करिअर कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नाशिक येथील प्रा.निशा पाटील उपस्थित होत्या.
त्यांनी या ॲनिमेशन विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले.सध्याचे युग हे ॲनिमेशन युग आहे, तर मुलांनी नवीन ॲनिमेशन करिअर कडे वळण्यासाठी त्यांना शालेय जीवनात कसा पाया भक्कम करावा या संदर्भात माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्तीने प्रश्न विचारले आणि शाळेमध्ये सुरू असलेल्या कम्प्युटर कोडींविषयी शिकवत असल्यामुळे ॲनिमेशन विषय समजून घेताना मुलांना अडचण आली नाही यासाठी विशेष करून श्रीमती निशा पाटील यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. याप्रसंगी संस्थेच्या संस्थापिका डॉ.वंदनाताई मुरकुटे, प्राचार्या प्रीती गोटे ,निशा पाटील , शुभांगी ब्राह्मणे, रुची केदारी, प्रीती भांड ,प्रताप सिंग राठोड उपस्थित होते.तसेच विद्या लोखंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सहयोगी:
पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111