शब्दगंध साहित्य संमेलनात विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

13 October 2023

शब्दगंध साहित्य संमेलनात विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी




अहमदनगर प्रतिनिधी :

 शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते, या सर्व विद्यार्थ्यांनी विविध सत्रामध्ये साहित्यिक आनंद घेतला. छायाचित्र, चित्रकला, शिल्पकला प्रदर्शन पाहून ग्रंथ खरेदीही केली.  संमेलनाचे स्वागताध्यक्ष, अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.



 के. जे. सोमय्या कला, वाणिज्य ,विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव, कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय,आश्वी खुर्द, ता. संगमनेर ,बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स,कॉमर्स महाविद्यालय बेलापूर,अशोकनगर येथील आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,अशोकनगर ता. श्रीरामपूर या महाविद्यालयाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.



अहमदनगर शहरातील ना.ज. पाऊलबुद्धे विद्यालय,भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय, ज्ञानसरिता विद्यालय,वडगांव गुप्ता, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय,नवी पेठ या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.



    बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे,अशोक नगरच्या प्रा. सुनिता गायकवाड , के जे सोमय्या कॉलेजचे प्रा.डॉ.संजय दवंगे, आश्वी बुद्रुक कॉलेजच्या प्रा.डॉ. सारिका शेटे प्रा. दिपाली तांबे, प्रा. गणेश शेळके,लक्ष्मीबाई पाटील शाळेचे शिवाजीराव लंके, अमित धामणे, पालवे, पाऊलबुद्धे विद्यालयाचे देविदास बुधवंत, भाऊसाहेब फिरोदिया चे परशुराम मुळे, श्री त्रिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी चे अशोक दौंड, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश मिसाळ, छबुराव फुंदे,शशिकांत गायकवाड, बबनराव गिरी यांच्यासह अनेक शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थ्यांसह या संमेलनात सहभागी झाले होते.



यावेळी बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य जी.पी ढाकणे,चित्रकार श्रीधर अंभोरे, प्रा. मधुसूदन मुळे, प्रा.डॉ.लीलाताई गोविलकर, प्रा. मेधाताई काळे, ग्रामसेवक संघटनेचे एकनाथ ढाकणे ,अमित खान दूल्हेखान, कामगार संघटनेचे अड.एडवोकेट सुधीर टोकेकर, कॉ.अनंत लोखंडे यांच्यासह संत गाडगेबाबा छात्रालयाचे १९९० चे माजी विद्यार्थी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.



सर्व प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

सहयोगी:

पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -:9561174111 




LightBlog

Pages