श्रीरामपूर प्रतिनिधी :
तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी लक्ष्मण कचरे आणि द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी प्रणाली पाटील यांनी पेमराज सारडा महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत शारदा करंडकचे सांघिक प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले आहे.
याच स्पर्धेत वैयक्तिक प्रथम प्रणाली पाटील तर वैयक्तिक उत्तेजनार्थ पारितोषिक लक्ष्मण कचरे यांना मिळाले तसेच न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर आयोजित राज्यस्तरीय कॉम्रेड एकनाथराव भागवत करंडक वक्तृत्व स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांक मिळवला तर वादविवाद स्पर्धेत सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रणाली पाटील व लक्ष्मण कचरे यांनी पटकावले.त्यांच्या या यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव ॲड.शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, रविंद्र खटोड,भरत साळुंके, चंद्रशेखर डावरे, बापुसाहेब पुजारी,श्रीवल्लभ राठी, ॲड.विजय साळुंके,प्रेमा मुथ्था, राजेंद्र सिकची, प्रा.हंबीरराव नाईक,शिक्षक प्रतिनिधी प्रा.नामदेव मोरे, प्राचार्य प्रो.डॉ. गुंफा कोकाटे,प्रा.प्रकाश देशपांडे ,वक्तृत्व समितीचे समन्वयक डॉ.बाळासाहेब बाचकर , प्रा.सुनिता पठारे,वादविवाद समितीचे डॉ. अशोक माने,प्रा.ओंकार मुळे, डॉ.मनोज तेलोरे, डॉ.विठ्ठल लंगोटे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक ,विद्यार्थी विद्यार्थिनी,समस्त ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सहयोगी:
पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111