इस्रायल आणि हमास संघटना यांच्यातील संघर्ष काही संपत नाहीये. पण हा संघर्ष सुरु असताना इस्रायलसाठी आणखी एक धोक्याची घंटा आहे. चारही बाजुंनी शत्रूंना वेढलेला हा देश आणखी संकटात येऊ शकतो. आता संपूर्ण जगाचं लक्ष याकडे लागले आहे की, हे युद्ध आणखी वाढू नये.
इस्रायल-हमास मधील संघर्ष अजून संपलेला नाही. गाझा पट्टीला ताब्यात घेण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायलने रणनिती आखली आहे. हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवर लढाई होणार आहे. इस्रायलने गाझामधील हमासचे ७५० लष्करी तळ नष्ट केले होते. तीन लाख सैन्य इस्रायलकडून तयार ठेवण्यात आलं आहे. इतकं असून देखील ही लढाई इस्रायलसाठी सोपी नसणार आहे. कारण हा लढा केवळ हमासशीच नाही तर इस्रायलच्या इतर शत्रूंसोबत देखील होणार आहे. इस्रायलच्या सीमांना सर्व बाजूंनी धोका आहे. लेबनॉनमध्ये देखील युद्धाचे वातावरण आहे.
आणखी एक संघटना सक्रीय
लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्ला देखील या संघर्षात उडी घेण्यास उत्सुक आहे. हमासप्रमाणे या संघटनेलाही इराणचा पाठिंबा आहे. ती सध्या हमासला मदत करत आहे. सध्या ही संघटना फक्त सीमेवर आहे, पण ती कधीही युद्धात उतरू शकते. इस्रायलला याचा देखील धोका आहे. हे त्यांना देखील चांगले माहित आहे. हे युद्ध कधीही सुरु होऊ शकते. लेबनॉनमध्येही नुकतीच पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.
हमासला संपवण्यासाठी इस्रायलकडून हल्ले
इस्रायलने अनेकदा अरब देशांना पराभवाची धूळ चारली आहे. असं असताना यावेळी मात्र इस्रायलसाठी हे युद्ध सोपे नसणार आहे. कारण यामध्ये मोठी जीवीतहानी तसेच संपत्तीचा नाश होतो. हे आव्हान जगापुढे देखील असणार आहे. कारण या युद्धाचा परिणाम इतर देशांवर देखील होणार आहे. युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
इस्रायल हमासला संपवल्याशिवाय माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. इस्रायलने हवाई हल्ले करून सीरियातील दोन प्रमुख विमानतळ उद्ध्वस्त केले. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराचा सीरियावरील हा पहिलाच हवाई हल्ला होता. इस्रायलच्या हल्ल्यानंतर विमानतळांवर उड्डाणे थांबवावी लागली. सीरिया सध्या अशांत आहे. मुस्लीम देश इस्रायलला चिथावणी देत आहे.
चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेला देश
इस्रायल चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेला देश आहे. इराण या युद्धात पडला तर तिसरे महायुद्ध सुरु होऊ शकते. या संघर्षामुळे जग दोन गटात विभागला गेलाय. काही जण इस्रायल तर काही जण पॅलेस्टाईनकडून निदर्शने करत आहेत. लोकं रस्त्यावर उतरले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही इस्रायलला इशारा दिला आहे. या लढाईत इतर कोणत्याही देशाने उडी घेतली तर त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. रशियासोबतच्या युद्धात युक्रेनला जशी साथ दिली तशीच अमेरिका या युद्धात इस्रायलला साथ देत आहे.
हमास-इस्रायल युद्धामुळे
जगाच्या चिंता वाढल्या
७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला त्यामुळे इस्रायलच्या सुरक्षा चक्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हमासकडून पुन्हा कधीही हल्ला होऊ शकतो. हे युद्ध अजून संपलेले नाही. हमासचे दहशतवादी अजूनही घातपाताची वाट पाहत आहेत. पण जर इतर देश या युद्धात सहभागी झाले तर मग जगाचे चित्र काही वेगळे असू शकते.दरवेळी इस्त्राईलला अमेरिका आणि इतर राष्ट्रांचा पाठिंबा मिळतो यावेळी मात्र अरब गल्फ नेशन्स सह ५७ मुस्लिम राष्ट्र संघटनेंचा पॅलेस्टाईन ला पाठिंबा मिळाला असल्याने इस्त्राईलची मोठी चिंता वाढली आहे.यावेळी इस्त्राईलला हे युद्ध सोपे राहणार नाही तर याउलट मोठी किमत चुकती करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.