सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब बनसोडे यांचा सन्मान - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

22 November 2022

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब बनसोडे यांचा सन्मान




 रमेश जेठे सर- अहमदनगर

अहमदनगर येथील महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब बनसोडे यांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बीड येथील रयत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला.

हल्लीच्या दगदगीच्या जिवनात जो तो स्वतःसाठी जगतो आहे, स्वतः साठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने इतरांसाठी कसा वेळ देता येवू शकणार प्रत्येक मनूष्य सध्या याच विचाराने ग्रासला असल्यामुळे सामाजिक कार्याची गती मंदावल्यासारखे वाटत आहे,

मात्र आपणही समाजाचे काही देणे लागतो अशी भावना उराशी बाळगून समाजकार्य करणारे खरे समाजसेवकांची संख्या देखील आज अक्षरशः बोटावर मोजता यावी इतकीच शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे.

 मात्र आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात भावनेने नेहमी समाज कार्यात सक्रिय असलेले अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.आण्णासाहेब बनसोडे हे पुर्वीपासूनच सामाजिक कार्यात निस्पृहतेने आपले सामाजिक कार्य करत आहेत,कर्मयोग प्रतिष्ठाण ट्रस्ट अहमदनगर या संस्थे मार्फत त्यांनी उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या वंचित समाज व इतर सर्वंसामान्य लोकांच्या मुलभूत गरजा आणि त्याचे निवारण करण्याकामी योग्य मार्गदर्शन तथा कायमस्वरूपी सहकार्याच्या भूमिकेतून सातत्याने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशनचे ते अहमदनगर शहर अध्यक्ष म्हणून काम पाहत असल्याने इतरही अनेक स्वयंसेवी संस्थांना योग्यते मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांचे आजही अविरतपणे चालू आहे.

मागील कोरोना संकट समयी त्यांनी गरजवंत सर्वसामान्य नागरीकांना आवश्यक तथा वैद्यकीय मदत मिळवून देण्याकामी मोलाचे सहाय्य केले आहे.त्यांच्या अशा या विविध सामाजाभिमुख कार्यांची दखल घेवून बीड येथील रयत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानबद्दल महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष दिपक आगळे पाटील. प्रदेश उपाध्यक्ष सौ. विद्या ताई बेनगुडे, प्रदेश सरचिटणीस सुनील मातकर,प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रकाश पवार, प्रदेश कार्याध्यक्ष आदिकराव जगताप, प्रदेश सचिव अभिषेक पठारे, जिल्हाध्यक्ष वसंतराव कर्डीले पाटील, समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,फिनिक्स फाऊंडेशन चे अध्यक्ष जालिंदर बोरुडे,आधार सेवा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंतराव मोटे,जीवनधारा फाऊंडेशन चे अध्यक्ष अमोल लगड पाटील आदिंची त्यांचे अभिनंदन केले आहे.

LightBlog

Pages