जावेद शेख - पाचोरा
अवैध्यरित्या दारू विक्री करणार्या दोघा आरोपींना काल पाचोरा न्यायालयाने प्रत्येकी ३ महिने कारावास व प्रत्येकी ३ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावल्याने तालुक्यासह जिल्ह्यात या निर्णयाचे सर्वच स्थरातुन स्वागत होत असुन अवैद्यरित्या दारू विक्री करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.याबाबात प्राप्त माहीती अशी की,
पिंपळगाव (हरे.) पोलिस स्टेशन हद्दीत खंडु माळी व संजय शिंदे हे अवैद्यरित्या दारू विक्री करत असल्याबाबत पोलिस शिरस्तेदार उज्वल जाधव यांनी सन - २०२१ मध्ये पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणी पाचोरा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावनीत काल दि. २४ रोजी प्रथम वर्ग सह दिवानी न्यायाधिश मा. श्रीमती एम. जी. हिवराळे यांनी सी.आर.पी.सी. २५२ (२) प्रमाणे खंडु माळी व संजय शिंदे या आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ३ महिने सक्षम कारावासाची व प्रत्येकी ३ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच सुनावनी आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे विशेष सहा. सरकारी अभियोक्ता अनिल पाटील हे होते. तर पैरवी पोलिस कर्मचारी म्हणून प्रदिप पाटील व केसवाॅच राजेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले आहे.