मालखेडा येथे भरघाव चारचाकी वाहन पाण्यात पलटी; ग्रामस्थांनी वाचविले वाहनातील ४ युवकांचे प्राण - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

23 November 2022

मालखेडा येथे भरघाव चारचाकी वाहन पाण्यात पलटी; ग्रामस्थांनी वाचविले वाहनातील ४ युवकांचे प्राण




 पाचोरा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह ग्रामस्थ धावले मदतीसाठी 


जावेद शेख पाचोरा:

पाचोरा ते जामनेर रस्त्यावर मालखेडा येथे जामनेरकडुन भरधाव येणारे टाटा इंडिगो कंपनी चे एम.एच.१२ एन.एक्स.३०६६ या क्रमाकांचे चार चाकी वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मालखेडा गावाच्या बाहेर मोठ्या  पाण्याने भरलेल्या खड्यात पलटी झाले, यावेळी माणुसकी दाखवत येथील ग्रामस्थांनी चौघांचा प्राण वाचविले असल्याने माणुसकीचे दर्शन घडून आले आहे.यावेळी पाचोरा काॉग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी हे जामनेरकडुन पाचोराकडे जात असतांना अपघातस्थळी अपघातग्रस्तांची विचारपूस करून तात्काळ त्यांना मदततीचा हात पुढे केला.सदरील अपघात घडण्यापूर्वी वाहन चालकाने दोघा ग्रामस्तांच्या अंगावर देखील आपले वाहन टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने एकतर ते नशेत असणार किंवा मागे कुठेतरी अपघात वैगरे करुन पळत असणार असे उपस्थितांमधून चर्चा होताना ऐकवयास मिळाली आहे.



प्रतिनिधी जावेद शेख - पाचोरा

LightBlog

Pages