जावेद शेख पाचोरा
संपूर्ण जगात प्रथमच क्षेपणास्त्र प्रक्षेपण निर्माण करणारे तथा इंग्रजांशी लढताना आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांची जयंती पाचोरा शहरातील लब्बैक फाऊंडेशन तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ईकरा एज्युकेशन सोसायटी जळगांव चे चेअरमन डॉ.अब्दुल करीम सालार हे होते.
यावेळी ॲड.जुबेर शेख धुळे, मुख्य अतिथी मुफ्ती हारून नदवी साहेब,लेखक व शायर साबीर मुस्तफा आबादी आणि अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे सांगितले की, अमेरिकेतील नासा मध्ये ज्या भारतीय मिसाईलमेनचे चित्र लावलेले आहे ते शेर ऐ म्हैसूर टिपू सुलतान यांचे आहे. ही प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. ह.टिपू सुलतान यांनी शिक्षण, व्यापार, विज्ञान, अनुसंधान,व्यवस्थापन, प्रशिक्षिण,नौदल,आंतरराष्ट्रीय संबंध,यावरआपले उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. ह.टीपू सुल्तान नेहमी म्हणत असत,("शेर की एक दिन की जिंदगी लोमडी के सौ साल के जिंदगी से बेहतर है")
या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी लब्बैक फाऊंडेशन चे सदस्य शाकीर शाह,जुबेर खाटीक, खलील सय्यद, गफ्फार सय्यद यांचे मोठे परिश्रम लाभले, म्हणून त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल मान्यवराकडून कौतुक देखील करण्यात आले.यावेळी दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांचे व कष्टाळू शिक्षक शेख जावेद आणि रेहान खान यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचवर मजहर पठाण, निहाल बागवान, हाजी अल्ताफ, जाकीर कुरेशी, रसूल उस्मान, मुस्लिम बागवान,जाकिर अलाउद्दीन,रफिक मेंबर,लतीफ मेंबर, खलील दादा देशमुख, नसीर बागवान, डॉ. इम्रान पिंजारी,संजय चौधरी, तहसील शेख,आदिल शेख आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.सूत्र संचालन साबीर मुस्तफा आबादी यांनी केले.तर गफ्फार सय्यद, व जुबेर खाटिक यांनी आभार मानले.
प्रतिनिधी जावेद शेख - पाचोरा