हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचा हिजामा,रक्तशुद्धी कॅम्प - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

20 November 2022

हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचा हिजामा,रक्तशुद्धी कॅम्प





 राजेंद्र बनकर -शिर्डी

शिर्डी येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्यावतीने हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त शालीमार मार्केट येथे रक्तशुद्धी कॅम्प घेण्यात आला. याप्रसंगी शिर्डी नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, अशोक गोंदकर,शिर्डी पो.स्टेशनचे मकासरे आदींसह मान्यवरांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रसंगी या रक्तशुद्धी उपचार पद्धतीने शरीरातील ७२ रोगांवर आगदी साध्या पद्धतीने उपचार करुन रोग बरे होतात तसेच शरीरातील अनावश्यक साचलेले रक्तातील घटक बाहेर पडून शरीरात रोगप्रतीकार शक्ती वाढते तर या उपचार पद्धतीने आजपर्यंत अनेकांना मोठा फायदा झाला असुन गेल्या चार वर्षापासून हा कॅम्प घेतला जात असल्याचे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे संस्थापक महेमुद सय्यद यांनी सांगितले.

तर माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत ही संस्था नेहमीच थोर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी या जनहितासाठी करत असुन यातून  खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य घडत असल्याचे स्पष्ट केले. तर अशोक गोंदकर यांनी या साध्या मात्र प्रभावी उपचार पद्धतीचे कौतुक करत संस्था ही सर्वसामान्य घटकांना देत असलेल्या विविध सुविधांबद्दल शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी शमशुद्दीन अशरफ सय्यद, दादा इनामदार, मूख्तार सय्यद, साजिद शेख,अखलाक  खान, बरकत सय्यद, पापाभाई,सरदार भाई पठाण,महेबबु पठाण, सिंकदर पठाण,याकुब शेख,  आसिफ इनामदार, हैदर सय्यद, खलिल शेख ,रज्जाक शेख , खलील पठाण, अजीज बागवान, शफीक शहा,जलील पठाण, तौहीद पठाण,आदींसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LightBlog

Pages