जावीद शेख पाचोरा
पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हे गावात अवैध दारु विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन तर्फे धाडसत्र राबवून गावठी दारु विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका सुरु केल्यामुळे अवैध दारु विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून याचाच राग येऊन कोल्हे येथील गावठी दारु विक्रेत्यांनी गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांना भरचौकात शिवीगाळ करुन दहशत माजवण्याच्या केविलवाणा प्रयत्न केला आहे.परंतु अवैध धंदे करणाऱ्यांची इतकी हिंमत वाढलीच कशी ? असा प्रश्न कोल्हे गावच्या ग्रामस्थांना भेडसावत असल्याने या अवैधरित्या गावठी दारु विक्रेत्यांवर तसेच सट्टा बेटींग घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. वारंवार कारवाई करुन सुध्दा हे दारु विक्रेते कायद्याला किंवा गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांना जुमानत नसल्याने यांच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही नागरीकांकडून केली जात आहे.