समीर बेग राहाता
धन्यवाद मोदीजी' अभियानात उत्तर नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले योजना बद्दल धन्यवाद मोदीजी असे पत्र उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे मार्गदर्शनाखाली 'धन्यवाद मोदीजी अभियान' अत्यंत कार्यक्षमतेने राबवून महाराष्ट्र राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या अभियानाचे जिल्हा संयोजक राजेंद्र सांगळे, सहसंयोजक अनिल भनगडे व अंकुश काळे यांचेसह नगर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात धन्यवाद मोदीजी अभियान जोरदारपणे राबविण्यात आले. उत्तर नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांनी सुमारे 17125 पोस्टकार्ड लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्राप्त केले. मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी या अभियानाचे जिल्हा संयोजक श्री.राजेंद्र सांगळे व सहसंयोजक अनिल भनगडे यांच्यासह आनंद बुधेकर व राजेश शर्मा यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात जाऊन धन्यवाद मोदीजी अभियानाची पोस्टकार्ड श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत,प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब,या अभियानाच्या प्रदेश संयोजिका सौ.श्वेता शालिनी, सह संयोजक हर्षल विभांडीक यांचेकडे जमा केले.
ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष मा.बावनकुळे साहेब यांनी,उत्तर नगर जिल्हा भाजपने केलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. उत्तर नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमा बद्दल व मिळविलेल्या यशाबद्दल महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी या अभियानात मेहनत घेणाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे,अशी माहिती जिल्हा भाजप सहप्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी यांनी दिली.