बचत गटांचा हा यशस्वी प्रवास पाहण्यास "मी पुन्हा येईन"- सौ.अमृता फडणवीस - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

15 November 2022

बचत गटांचा हा यशस्वी प्रवास पाहण्यास "मी पुन्हा येईन"- सौ.अमृता फडणवीस


 


उपस्थित महिलांच्‍या आग्रहाखातर सौ.अमृता फडणवीस यांनी शिवतांडव स्‍तोत्राच्‍या काही ओळी गाऊन दाखविल्‍या. पुर्ण गाणं गाऊन दाखविण्‍यासाठीही ‘मी पुन्‍हा येईन’ असे अभिवचन देताना महिलांनी टाळ्यांच्‍या गजरात त्‍यांना दाद दिली.


राहाता समीर बेग

तालुक्यातील लोणी येथील जनसेवा फौंडेशन आणि राहाता पंचायत समिती यांच्‍या संयुक्‍त  विद्यमाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या महिला बचत गटांचा मेळावा जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला. मेळाव्‍यापुर्वी सौ.अृमता फडणवीस यांच्‍या हस्‍ते सिंधूताई शेतकरी महिला उत्‍पादक कंपनी, महिलांकरीता  स्‍वतंत्र व्‍यायामशाळेचे उद्घाटन करण्‍यात आले. जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यतून उत्‍पादीत करण्‍यात येत असलेल्‍या सेंद्रीय सॅनिटरी नॅपकीनच्‍या उत्‍पादनाची पाहाणी करुन, त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. महीला मेळाव्‍यात बचत गटांना या मेळाव्‍यात २ कोटी रुपयांच्‍या अनुदानाचे वितरण तसेच प्रधानमंत्री अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत बियानांचे वाटप सौ.फडणवीस यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. लोणी परिसरात येताच सौ. फडणवीस यांनी प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळावर जावून पुष्‍पचक्र अर्पण केले. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडू यांच्‍यासह सर्व संचालक,आधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अकोले नगर परिषदेच्‍या नगराध्‍यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी, उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, प्रभारी गटविकास आधिकारी श्री. सुर्यवंशी, तालुका कृषि आधिकारी बापूसाहेब शिंदे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या सेक्रेटरी सौ.लिलावती सरोदे,जनसेवा फौंडेशनचे सचिव डॉ.हरिभाऊ आहेर, लोणी बुद्रूकच्‍या सरपंच श्रीमती कल्‍पना मैड, प्रभावती खालकर, प्रकल्‍प संचालिका सौ.रुपाली लोंढे यांच्‍यासह बचत गटांच्‍या महिला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या. याप्रसंगी महिलांशी संवाद साधताना सौ. फडणवीस म्‍हणाल्‍या की, समाजातील प्रत्‍येक महिला ही पुजनिय आहे, तिच्‍यामध्‍ये एक सकारात्‍मक उर्जाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आपल्‍या स्‍वकर्तृत्‍वाने पुढे जात आहेत. ‘बेटी बचाव बेटी पढाव पेक्षा आता ‘बेटी को आगे बढाओ, घर पे मत बिठाओ’ असा संदेश घेवून पुढे जावे लागणार आहे.यातूनच नवा आत्‍मविश्‍वास निर्माण होईल असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.  पिता, पुत्र आणि पती या पलिकडेही जावून आता महिलांना आपल्‍या उत्‍कर्षाचा विचार करावा लागेल. नव-याबरोबर घर उत्‍तमपणे चालवू शकते. तसेच आता कोणत्‍याही क्षेत्रात आपण चांगले काम करुन दाखवू शकतो हा विश्‍वास मनामध्‍ये बाळगुन काम केले पाहीजे. ऐकायचे जगाचे आणि करायचे मनाचे हा संदेश देवून सौ.फडणवीस म्‍हणाल्‍या की, बचत गटांनी कर्ज जरुर घ्‍यावे, यातून लघुउद्योग, कुटीर उद्योग उभारुन दाखवावे. कारण बॅंकींग क्षेत्रातील माझा अनुभव असा आहे की, खुप मोठ्या टक्‍केवारीने कर्ज हे बुडत असतात परंतू महिला बचत गट कर्ज परत करत आहे याचा मला अभिमान आहे. तुमच्‍या उत्‍पादनाची विक्री चांगल्‍या पध्‍दतीने होत आहे. या मागे तुमची मेहनत सुंदर उत्‍पादन देण्‍याची संकल्‍पना आणि मार्केटींगसाठी चांगले ट्रेनिंगची शिदोरी तुमच्‍याकडे असल्‍यानेच तुमचा प्रवास जनसेवा फौंडेशन आणि विखे पाटील कुटूंबियांच्‍या माध्‍यमातून यशस्‍वी सुरु होणारा प्रवास पाहण्‍यासाठी ‘मी पुन्‍हा येईन’ कारण या भागामध्‍ये विकासाचे पाहाण्‍यासारखे काम खुप आहे. बचत गटासारख्‍या चळवळीतून प्रत्‍येक गावाने आर्थिक विकासात योगदान दिल्‍यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ५ अब्‍ज डॉलर्स अर्थव्‍यवस्‍थेचे स्‍वप्‍न पुर्ण होण्‍यास वेगळ लागणार नाही, पण यासाठी कष्‍ट, सुंदर उत्‍पादन, ट्रेनिंग घेवून चांगले मार्केटींग असा प्रवास तुम्‍हाला करावा लागेल. बचत गटांचा हा यशस्‍वी प्रवास पाहण्‍यासाठी ‘मी पुन्‍हा येईन’ असा आशावाद व्‍यक्‍त करुन सौ.अमृता फडणवीस यांनी उपस्थित महिलांमध्‍ये नवा आत्‍मविश्‍वास निर्माण केला.  याप्रसंगी जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या कार्याची माहीती आपल्‍या भाषणातून देतांनाच सौ. फडणवीस यांच्‍या  सारख्‍या बॅंकींग क्षेत्रातील अनुभवी व्‍यक्तितत्‍व आपल्‍या महि‍लांशी संवाद साधण्‍यासाठी आल्‍या याचा मला खुप अभिमान असल्‍याचे नमुद करुन, त्‍यांच्‍या सामाजिक बांधिलकीचाही आपल्‍या भाषणात त्‍यांनी गौरव केला. गटविकास आधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी प्रास्‍ताविक केले. डॉ.हरिभाऊ आहेर यांनी आभार मानले. या मेळाव्‍यास राहाता तालुक्‍यातील बचत गटांमधील महिला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या. यासर्व महिलांबरोबर सौ. अमृता फडणवीस यांनी सेल्‍फी तसेच फोटोसेशन करुन महिलांचा आनंद व्दिगुणीत केला.

LightBlog

Pages