वजीर शेख पाथर्डी:
तालुक्यातील पाडळी येथील वजीर शेख यांना,जनकल्याण सामाजिक सेवा संस्था व, सरपंच सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार,, समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
वजीर शेख यांचे सामाजिक, धार्मिक ,कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे,हा कार्यक्रम अहमदनगर माऊली संकुल सभागृहात आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी माजी,खा. भाऊसाहेब वाकचौरे,आ,सुधीर तांबे,उदयसिंह पाटील,रोहित पवार, सौ सुरेखाताई कोते,सौ. वंदना पोटे ,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावसे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमासाठी राज्यभरातुन अनेक मान्यवर उपस्थित होते, वजीर शेख यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, शशिकांत नवगिरे,छानराज क्षेत्रे,सूरज क्षेत्रे, पत्रकार विलास जी मुखेकर, नितिनजी देवकर,ॲड,लक्ष्मण बोरुडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.