ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर रिफ्लेक्टर बसवा -देविदास देसाई - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

16 November 2022

ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर रिफ्लेक्टर बसवा -देविदास देसाई





 श्रीरामपूर (प्रतिनिधी):

रस्त्यावरील वाढते अपघात टाळण्यासाठी ऊस वहातुक करणाऱ्या वाहनांना तातडीने रेडीयम व रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .                                प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात श्री. देसाई यांनी पुढे म्हटले आहे की, ऊस वहातुक करणारी वाहने भरधाव वेगाने चाललेली असतात, एका ट्रक्टरला दोन दोन ट्राँली जोडलेली असतात, रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे ऊस वहातुक करणारे वाहन दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते तसेच ऊस वहातुक करणाऱ्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते पाठीमागे असणाऱ्या वाहनाने हाँर्न वाजविला तरी मोठ्या आवाजात असलेल्या गाण्यामुळे चालकाच्या ते लक्षात येत नाही तो चालक केवळ गाण्याच्या तालातच वाहन चालवत असतो त्यामुळे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनावर मोठा स्पिकर लावण्यास परवानगी देवु नये ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर मोठाले स्पिकर असणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी तसेच परिवहन कार्यालयाने तसे लेखी पत्र संबधीत साखर कारखान्यांना द्यावे असेही देसाई यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

LightBlog

Pages