श्रीरामपूर (प्रतिनिधी) : साहित्यिक डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांनी 'भारतीय कुंभार समाजातील संत 'हा संशोधन ग्रन्थ अतिशय कष्टपूर्वक निर्माण केला आहे,देश, राज्य,स्थानिक अशा स्थळ, काळ दृष्टीने लिहिलेला हा मराठीतील एकमेव संधोधन ग्रन्थ असल्याचे मत धाराशिव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तेर येथील श्री संत गोरोबाकाका धर्मशाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, भक्ती पंचगव्य निसग्रोपचार चिकित्सा केंद्र प्रमुख ह.भ.प.डॉ.ईश्वर गोरोबा कुंभार महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ह. भ. प.डॉ. ईश्वर महाराज कुंभार यांचा सन्मान 'भारतीय कुंभार समाजातील संत', 'साहित्यशोध'संशोधन ग्रन्थ,इतर पुस्तके,शाल देऊन करण्यात आला,यावेळी प्रतिष्ठानच्या खजिनदार सौ.मंदाकिनी उपाध्ये, मंगळापूर येथील श्रीमती बिजलाबाई कारभारी उपाध्ये यांनी हा सन्मान केला.साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सदर संशोधन ग्रन्थाची माहिती देऊन स्वागत, सत्कार केला.पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे हे दोन्ही ग्रन्थ प्रकाशित झाले आहेत.नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने या प्रकल्प ग्रन्थास पुस्तक काढण्यासाठी पत्र देऊन, अनुदान प्रदान केले असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगून श्रीसंत गोरा कुंभार हे महाराष्ट्र प्रांताचे कुंभार समाजातील संत आहेत तसे प्रत्येक प्रांताचे विविध संत असून त्यांच्या चरित्र आणि लेखनाचा आढावा, मोठेपणा येथे सांगितला आहे.राज्यातील विविध संत, श्रीरामपूरातील संत कडुबा उफाडबाबा,ह.भ. प.तुळशीराम रसाळ महाराज, कोतुळचे संत कोंडाजीबाबा, महानुभावीय महंत केशवमुनी दर्यापूरकरबाबा असे कुंभार समाजातील संतजनांचे चरित्र,कार्य वाचनीय आहे. ह.भ.प.डॉ.ईश्वर कुंभार महाराज यांनी हा ग्रन्थ दुर्मिळ माहिती देणारा दस्तऐवज असल्याचे सांगितले,पुणे येथील लिज्जत पापडचे महाव्यस्थापक सुरेश कोते, कोल्हापूरचे भाषा संशोधक प्राचार्य डॉ.प्रकाश कुंभार, लातूर येथील 'विचारशलाका'चे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार,जामखेडचे कुंभार महासंघाचे माजी अध्यक्ष स्व. विठ्ठलराव राऊत, बेलापूर बदगी येथील रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक,समाजकार्यकर्ते संजय उकिरडे यांना अर्पण केलेला हा संशोधनग्रन्थ मौलिक स्वरूपाचा आहे,तो प्रत्येक जाणकार कुटुंबपरिवारात आणि अभ्यासू व्यक्तीकडे असावा अशी अपेक्षा डॉ. ईश्वर कुंभार महाराज यांनी व्यक्त केली.धर्मशाळा, वृद्धाश्रम, गोशाळा यांना मदत केल्याबद्दल कौतुक केले.प्रा. सौ. पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी आभार मानले.