अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा :
अमृत महोत्सवांतर्गत मेरी माटी मेरा देश उपक्रमामध्ये १ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर २०२३ कालावधीत अमृत कलश यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे सुक्ष्म नियोजन करत शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी एका आदेशाद्वारे सर्व यंत्रणांना दिले आहेत.
गावस्तरावर अमृत कलम तयार करताना घरोघरी माती गोळा करतेवेळी जाणीवजागृती, मिट्टीगान, विविध वाद्ये वाजवुन माती गोळा करण्याचा कार्यक्रम करण्यात यावा. सर्व गावातील कलश तालुक्याला प्राप्त झाल्यानंतर तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्या यावेत. गाव ते जिल्हा कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या पंचप्राण शपथ घेण्यात यावी. गावस्तरीय संकलित झालेल्या कलशांमधून तालुकास्तरावरुन एक कलश तयार करुन तो २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी मुंबई येथे आणुन दिल्यास २७ ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या क्रांती मैदान येथे प्रत्येक तालुक्यातुन दोन स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक यांच्याद्वारे पाठविण्यात यावा. नागरी भागासाठी सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीकरिता जिल्हा स्तरावर एक कलश करण्यात येईल. तसेच महानगरपालिकेचा स्वतंत्र एक कलश असेल. सर्व कलश स्वयंसेवक, युवकांद्वारे मुंबई येथे पाठविण्यात यावेत. मुंबई येथील कार्यक्रमानंतर सायंकाळी विशेष रेल्वेने हे कलश दिल्ली येथे नेण्यात येतील.
अमृत महोत्सवांतर्गत “मेरी माटी मेरा देश” उपक्रमामध्ये अमृत कलम यात्रा आयोजनाचे सुक्ष्म नियोजन करत हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111