श्रीरामपूर प्रतिनिधी :
लोकसेवा विकास आघाडी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार (ता.२० ऑक्टोबर) रोजी सायं. ५ वा. उत्सव मंगल कार्यालय येथे महिलांसाठी ‘दांडिया स्पर्धा व डिजे नाईट' चे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रसंगी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील ख्यातनाम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष रोहन डावखर तसेच स्वागत अध्यक्ष सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे यांच्या संकल्पनेतून सदरच्या दांडिया स्पर्धा व डिजे नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. दांडिया स्पर्धेसाठी भरीव बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती श्री.डावखर यांनी दिली. सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकसेवा विकास आघाडी नवरात्र उत्सव कार्यकारीणीच्या वतीने करण्यात आले आहे.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111