मिल्लतनगर च्या नागरी समस्या सोडविणार - मुख्याधिकारी शिंदे - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

11 October 2023

मिल्लतनगर च्या नागरी समस्या सोडविणार - मुख्याधिकारी शिंदे




श्रीरामपूर प्रतिनिधी :

 शहरामध्ये नवीन विकसित झालेल्या मिल्लतनगर परिसरातील जनतेच्या सर्व समस्या आगामी काळात सोडविल्या जातील.त्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाकडून लक्ष घातले जाईल असे आश्वासन नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी मिल्लतनगर मधील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.

गेली अनेक महिने मिल्लतनगर मधील नागरिक विविध समस्यांचा सामना करीत आहेत. या संदर्भात या भागातील विविध प्रश्न घेऊन ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शेख नजीर गफूर (उर्फ नजीर मामू) मिल्लत मशिदीचे ट्रस्टी हाजी युसूफभाई,सामाजिक कार्यकर्ते सलाउद्दीन शेख आदींच्या नेतृत्वाखाली या भागातील शिष्टमंडळाने नुकतेच नगरपालिकेत मुख्याधिकारी शिंदे यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली. 

मिल्लत चौक ते पाण्याच्या साठवण तलावाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा,मिल्लतनगरच्या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात यावीत,या भागामध्ये अंगणवाडी सुरू करावी,  परिसरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या भागात गार्डन विकसित करावे, या भागातील ओपन स्पेसचा विकास करावा, कालव्याच्या कडेने पाटबंधारे खात्याने केलेले विद्रूपीकरण थांबवावे,मिल्लत चौकातील अतिक्रमणे काढावी, चर्च रोडवर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे, या परिसरामध्ये बहुउद्देशीय सभागृह निर्माण करावे, पाण्याच्या तलावा शेजारील सांडपाण्याची गटार पाईपलाईन टाकून बंद करावी आदि मागण्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

अंगणवाडीसाठी प्रस्ताव तातडीने पाठवू, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करू, अतिक्रमणांबाबत योग्य कारवाई करू, कालव्याकडेच्या विद्रूपीकरणाबाबत पाटबंधारे खात्याला आम्ही पत्र दिले आहे, त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून हा प्रश्न मार्गी लाऊ,अन्य प्रश्नांबाबत नगरपालिकेच्या विविध खाते प्रमुखांना आदेश देऊन सर्व प्रश्न सोडवू असे आश्वासन श्री.शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.

जनतेच्या प्रश्नांसंदर्भात साधा मेसेज जरी आला तरी त्याची दखल घेऊन कार्यवाही करणारे गणेश शिंदे हे पहिले मुख्याधिकारी आहेत. असे सांगून ते नेहमी शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असतात परंतु पालिकेतील खाते प्रमुखांकडून जनतेच्या प्रश्नांची फारशी दखल घेतली जात नाही अशी खंत पत्रकार सलीमखान पठाण यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी झालेल्या चर्चेमध्ये शिष्टमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी भाग घेतला. नगरपालिकेचे उत्तम प्रशासक म्हणून चांगले कार्य करीत असल्याबद्दल मिल्लतनगर परिसरातील नागरिकांच्यावतीने हाजी युसूफभाई व नजीर मामू शेख यांच्या हस्ते मुख्याधिकारी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

 शिष्टमंडळात समीरखान पठाण, सलीम पटेल, अफरोज शाह, तनवीर शेख, इमरान पोपटिया आदींचाही समावेश होता.

मुख्याधिकाऱ्यांनी एकदा या परिसराला भेट देऊन जनतेच्या समस्या सविस्तर जाणून घ्याव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने शिंदे यांच्याकडे केली.शेवटी सलाउद्दीन शेख यांनी आभार मानले.



----------------------------------------------------------

पहिले मुख्याधिकारी

शहराचे नागरिकांनी साधा मेसेज जरी केला तरी त्याची दखल घेऊन तातडीने कारवाई करणारे मुख्याधिकारी गणेश शिंदे हे श्रीरामपूर नगरपालिकेचे पहिले मुख्याधिकारी आहेत.त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची ते दखल घेतात असे सांगून ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांनी 'जनतेच्या प्रश्नांची दखल घेणारा अधिकारी' असे सांगत त्यांचा गौरव केला.

----------------------------------------------------------

कॅनाल परिसर स्वच्छ करा - नजीर मामू शेख

मिल्लतनगर परिसरातून जाणाऱ्या कालव्यामधील गाळ काढून वर टाकण्यात आला आहे,परंतु पाटबंधारे खात्याने तो उचलून नेलेला नाही. त्यामुळे हा संपूर्ण परिसर अतिशय घाण दिसत असून त्यामुळे हा भाग विद्रूप झाला आहे. तरी नगरपालिका व पाटबंधारे खात्याने मिळून हा सर्व परिसर स्वच्छ करावा अशी मागणी यावेळी नजीर मामू शेख यांनी केली.

----------------------------------------------------------

संकलन :

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages