रमेश जेठे अहमदनगर
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते रमेश नरसय्या सब्बन (वय ९५) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते निवृत्त प्रशासकीय अधिकारी, कृषी विभाग,महाराष्ट्र शासन,तथा पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक व माजी उपाध्यक्ष होते, त्यांनी कृषी विभागात प्रदीर्घ सेवा केली. अत्यंत प्रामाणिक, निस्पृह, करारी,अत्यंत शिस्तप्रियरीतीने शासकीय व सार्वजनिक जिवनात कार्यरत राहीले.संपूर्ण कृषी खात्यात त्यांच्या निस्पृह प्रमाणिक कार्याची दखल सतत घेतली जात असे.सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभागी होत असत वयाच्या शेवट पर्यत शैक्षणिक कार्यात सहभागी होत होते.नवनाथ पंथी चैतन्य देवेंद्रनाथ यांचे आवडते परम शिष्य होते. नवनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिवपदही त्यांनी संभाळले होते.सिध्दांतीक जीवन शैली मुळे अनेक क्षेत्रातील त्यांचा मोठा मित्र परीवार व चाहता वर्ग होता.त्यांच्य पश्चात भाऊ,दोन मुले,दोन मुली,सुना,पुतणे, पुतण्या,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन व सब्बन ऑटोमोबाईलचे चालक शिरीष सब्बन यांचे वडील होत. नुकतेच त्यांच्या थोरल्या मुलाचे निधन झाले होते.त्या पाठोपाठ काही दिवसांतच रमेश सब्बन यांचे निधन झाल्याने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळीक निर्माण झाली आहे.