पुस्तक परीक्षण: डॉ.बाबुराव उपाध्ये
जगात भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते,कारण ती मानवी जीवनाचा विवेकशील असा मूलस्रोत आहे.प्राचीन कालखंडातील ऋषीं, मुनी आणि वैज्ञानिक यांनी मानव आणि निसर्गाचा प्रभावी अनुभव घेऊन वाड्.मय तयार केले.याच वाटेवर भारतीय संतांनी 'ज्ञानदीप लावू जगी'या जाणिवेने निर्माण केलेले वाड्.मय आणि 'बुडती हे जन न देखावे डोळा 'या तळमळीतून केलेले समाजप्रबोधन मौलिक स्वरूपाचे आहे.पुणे येथील स्नेहवर्धन प्रकाशनच्या प्रकाशिका डॉ. स्नेहल तावरे यांनी संपादित केलेला'भारतीय संतांचे योगदान'हा ग्रन्थ अनेक अंगांनी वैविध्यपूर्ण आहे.
'भारतीय संतांचे योगदान'या संशोधन ग्रन्थात,३९ शोधनिबंध आहेत.महाराष्ट्र आणि इतर प्रांतांतील संतांचे योगदान यासंदर्भाने ३६ मराठी आणि ३ इंग्रजी लेखांचा यामध्ये समावेश आहे.अनेक वर्षे झाली पण संत वाड्.मय हे अमरत्वाचा धागा पक्का करीत आहे.मानवी जीवनाची शाश्वतमूल्ये ही संतसाहित्यात आहेत, जी जीवनपोषक आहेत. भक्तीबरोबर समाजप्रबोधन हा या साहित्याचा ठेवा आहे.सर्वसामान्य माणसाचे जीवन,मन सुरक्षित आणि आशावादी ठेवण्यात संतविचार, कार्य, चरित्र आणि साहित्य आजही सर्वगुणकारीच आहे.
डॉ. स्नेहल तावरे ह्या सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांनी पुणे येथील मॉडर्न कॉलेजमध्ये अनेक उपक्रम घेतले, स्नेहवर्धन रिसर्च फाऊंडेशनतर्फे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा घेतल्या, त्यापैकीच मॉरिशसमध्ये त्यांनी 'भारतीय संतांचे योगदान'या विषयावर आंतरविद्याशाखीय परिषद घेतली, त्यातून अनेक संशोधक, अभ्यासकांचे दिशादर्शक शोधनिबंध या पुस्तकात समाविष्ट आहेत. डॉ. स्नेहल तावरे यांनी' भारतीय संतांच्या योगदान' निमित्ताने लिहिलेले संपादकीय दिशादर्शक आहे. त्यांनी लिहिले आहे, "मॉरिशसमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. भारतीय संस्कृतीचे मॉरिशसमध्ये संवर्धन होत आहे. किंबहुना मराठी भाषा, मराठी संस्कृतीवर तेथील लोक मनापासून प्रेम करतात. महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये मराठी भाषेचे अध्ययन, अध्यापन सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मॉरिशसमध्ये ' भारतीय संतांचे योगदान'या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेणे आम्हाला उचित वाटले"
याच वाटेवरील हा सिद्ध झालेला संशोधन ग्रन्थ अनेक अभ्यासकांनी परिपूर्ण करण्यास योगदान दिले आहे.डॉ.नीला पांढरे, डॉ. शिवाजीराव मोहिते, डॉ.ज्ञानदेव रणनवरे, प्रा.अर्चना हातेकर, डॉ.बीदन आबा, प्रा. सुलभा मोहिते, श्री. प्रकाश शिंदे, डॉ. रेखा देशपांडे, डॉ. शोभा पाटील, डॉ. शोभा इंगवले, डॉ. अपर्णा साबणे, डॉ. शैलजा पाटील, डॉ. होमराजन गौरीया इत्यादींनी मराठी आणि भारतीय संत वाड्.मय यांचा घेतलेला वैचारिक आढावा पुढील अभ्यासकांना उपयुक्त ठरणारा आहे. डॉ. मधुमती कुंजल, प्रा. अनुराधा सावंत, डॉ. लता महाजन, डॉ. जयश्री रणनवरे, डॉ. दत्तात्रय गाढे, डॉ. शीला गाढे, डॉ. बाबुराव हिरडे, डॉ. पुष्पा गावित, डॉ. भारती नवथर, डॉ. वेदश्री थिगळे, डॉ. स्वाती काळभोर, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. जगदीश आवटे, प्रा. अपर्णा पांडे, डॉ. प्रतिभा पाटणे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. वामन जाधव, डॉ. जया कदम, डॉ. भारती शेळके यांचे लेख मार्गदर्शक ठरणारे आहेत. डॉ. शशी साळुंखे यांनी 'कहत कबीर 'या लेखातून संत कबीरांचे सांगितलेले वेगळेपण महत्वाचे आहे. डॉ. मंगला भवर यांनी 'भारतीय संत साहित्य में कबीर का योगदान 'हा लिहिलेला लेख अभ्यासपूर्ण आहे. ऐश्वर्या काळभोर, डॉ. शिल्पागौरी गणपुले, श्री लालसिंह तावरे यांनी लिहिलेले इंग्रजी भाषेतील लेख या संशोधन ग्रन्थाची भाषिक ज्ञानशीलता वाढवितात. शेवटी या संशोधकांचा अल्पपरिचय फोटोसह दिलेला आहे, या सर्वातून हा ग्रन्थ अनेक दृष्टीने गुणवत्तापूर्ण झाला आहे. वारकरी संप्रदाय आणि इतर संतसाहित्याचा घेतलेला हा शोध अभ्यासक, कीर्तन, प्रवचनकार, जिज्ञासू वाचक आणि सेवाभावी व्यक्तीला दिशादर्शक ठरणारा हा संशोधक ग्रन्थ प्रकल्प केल्याबद्दल डॉ. स्नेहल तावरे यांचे मनापासून अभिनंदन आहे.
==============
*'भारतीय संतांचे योगदान '
संपादक :डॉ. स्नेहल तावरे,
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे,
८ जानेवारी २०१५
पृष्ठे =३००, किंमत = ३०० रुपये
===============
पुस्तक परीक्षण :
डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर
भ्रमणभाष =9270087640
==============