देवीदास देसाई बेलापुर:
अहमदनगर येथील वाडीया पार्क मैदानावर पार पडलेल्या १५ वर्ष वयोगटातील मुलीच्या क्रिकेट चाचणीमध्ये बेलापुरची कन्या मिसबा जावेद शेख हीची जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे पुणे येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघात मिसबा हीची निवड झाली आहे श्रीरामपुर येथील साई अँकेदमीकडून खेळताना उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण उत्तम फलंदाज म्हणून तीची निवड करण्यात आलेली आहे मिसबा ही विद्यानिकेतन इंग्लिश मेडीयम स्कूल ऐनतपुर येथे झाले आहे बेलापुरच्या माजी उपसरपंच शिरीन शेख व माजी क्रिकेट खेळाडू जावेद शेख यांच्या त्या कन्या आहेत तिला साई क्रिकेट अँकेडमीचे महेश बोरावके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तिच्या निवडी बद्दल मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे पत्रकार देविदास देसाई कैलास चायल कै खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके जेषौठ नेते सुनिल मुथा विष्णूपंत डावरे दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी अभिनंदन केले आहे